शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २००८

मिलन

आकाशातून धरतीला
भेटण्या सख्या तो आला
सरं सरं कोसळती धारा
किती भेटीसं आतूर झाला.


नवी भेट हि दोन क्षितीजांची
श्रावण मासि अलगद जाहली
ऊन पावसी खेळ पाहुनी
धरती हि ती जणू लाज़ली.



पहा पहा वरुण ही भुलतो
धरणीचे लावण्य पाहूनी
सृष्टी हि सवागतात रमते
जणू हिरव्या गालिच्यांमधुनी.


इतुके निरागस प्रेम पाहुनी
नयनही गेले आज दिपुनी
असे अनोखे मिलन पाहुनी
त्रृप्त जाहले आज मी मनी.


असे अनोखे मिलन पाहूनी
त्रृप्त जाहले आज मी मनी.

-माधवी..




मझ्या एका मैत्रिणीने हि कविता केली आहे. माधवीनं.
कविता मनाला भावली , वाटल आपल्याला पण असं कविता वैगरे करता आली असती तरं......
मस्त पैकी blog वर post केली असती....म्ह्टंल एकदा विचारतो तिला.... कि, करु का post तुझी कविता माझ्या blog वरं...आणि मग मी तिची रीतसर permission घेतली. ती हो म्ह्टंली, नुसतं हो नाहि, तर म्हंटली सगळ्या कविता post करं. खुप बंर वाटलं.

बुधवार, १३ फेब्रुवारी, २००८

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्यानं चालल्या पानावर्हल्यारे लाटा


मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन


मन जह्यरी जह्यरी याचं न्यारं रे तंतर
आरे, इचू, साप बरा त्याले उतारे मंतर!


मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात


मन चप्पय चप्पय त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज आलं आलं धर्तीवर


मन एवढं एवढं जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना


देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात!
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत!


देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं!



– बहिणाबाई चौधरी

बुधवार, ६ फेब्रुवारी, २००८

वपु


पहिल्या वहिल्या भेटीत माणसं किती जवळची व्हावीत याला काही हिशोब असतो का? गणित असतं का?
मैत्री म्हटलं की खरं तर हीशोब, गणितं वगैरे व्यवहारीक शब्द टीकतच नाहीत. तरीही हेच शब्द पटकन पुढाकार का घेतात?

कुठलेही हिशोब न ठेवता जी गणीताप्रमाणे नेमकेपणा देते ती मैत्री.

-वपु काळे