कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १२ मे, २०१२

देव शोधून थकलो आम्ही

देव शोधून थकलो आम्ही, देव नाही, आणि देवपणहि नाही,
संत म्हणून गेले, 'देव माणसात शोधावा' 
म्हंटल माणूस शोधून पाहावा
पण अंती कळले माणूस हि उरला नाही,
आणि जो उरला; त्याला माणुसकीच कळली नाही... -(प्रशांत ठाकूर)

शुक्रवार, ११ मे, २०१२

किनारा सोडून फार खोलवर आलोय


किनारा सोडून फार खोलवर आलोय, खरच थकलोय फार हि नाव वल्हवून...
शांत बसलोय आता, प्रवाह नेहील  तिकडे जाण्याची मानसिक तयारी ठेऊन...
सगळच माझ्या हातात असताना, मोकळाही झालोय वर बोट दाखवून... - ( प्रशांत ठाकूर)

बुधवार, २६ जानेवारी, २०११

तू फक्त माझं झाड..

तू फक्त माझं झाड माझ्यावरल उन काढ

मी तुझा तारा नाही मला बघून दिशा ठरव

मी तुझा वारा नाही भिरभिर माझ्यामध्ये हरव

उधाणलेला समुद्र असेन पण तुझा किनारा नसेन

लाटांवरती स्वार हो माझ्यावरून पार हो

तुझ्यामध्ये भिजून उभा तसाच उभा राहीन मग

तू मात्र चालत रहा तू मात्र पुढेच बघ

अशीच असते गोष्ट खरी असच असत खर जग

मला तुझा शेवट नाही अस कस म्हणू सांग

आठवण आठवण आठवण आठवणींची लांबच रांग

अशा कितीक गोष्टी आणि अशा कित्येक रांगा

असे कित्येक किनारे आणि अशा कित्येक बागा

मीच माझा तारा तरी मलाच माझी दिशा नाही

मीच माझा वारा आणि भिरभिरणारा पाचोळा हि

उधाणलेला समुद्र मी पण खरच किनारा म्हणजे काय

अजून आहेत माझ्या वरती कितीक ठसे कित्येक पाय

मी थकून थकून जातो पायाखालचा रस्ता होतो

वाटेत एखाद झाड भेटत सावली मधून अंगाला खेटत

पण पुढे प्रवास तसाच असतो एकच पक्षी उडता दिसतो

चोचीमध्ये गाण असत पंखावर उन नसत

फ़क़्त काळजावरल्या खुणा सांगत राहतात पुन्हा पुन्हा

ते फ़क़्त तुझं झाड तुझ्या वरल उन काढ

तू फ़क़्त माझा झाड माझ्यावारलं उन काढ


- सौमित्र (तरीही)

शनिवार, २३ जानेवारी, २०१०

तुझच खर...


तुझच खर
आपल आयुष्य
आपल्या मनाप्रमाणे जागायच असत
तुझच खर
उगाच कोणाच्या अपेक्षांच्या
चौकटीत रहायच नसत
तुझच खर
हक्काच्या नात्यात सुद्धा
उगाच हक्क गाजवायच नसत
तुझच खर
कोणाचा शब्द झेलण्यासाठी,
आपल्या ईच्छाना मुरड घालायची नसते.
तुझच खर
तस तुला सगळ कळत,
चार ओळी लिहून तुला कोणी वेगळ सांगायाच नसत

शनिवार, १ मार्च, २००८

बीज अंकुरे अंकुरे . .

'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत,
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात!

बिजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ,
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात!


मी लहन असताना एक मालिका लागयची "गोट्या" मस्त मलिका होती. वरील ओळी ह्या त्या शिर्षक गीताच्या आहेत. मला खुप आवडायच ते गाण. कोणाकडे असेल तर कृपया संपर्क करा.

शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २००८

मिलन

आकाशातून धरतीला
भेटण्या सख्या तो आला
सरं सरं कोसळती धारा
किती भेटीसं आतूर झाला.


नवी भेट हि दोन क्षितीजांची
श्रावण मासि अलगद जाहली
ऊन पावसी खेळ पाहुनी
धरती हि ती जणू लाज़ली.



पहा पहा वरुण ही भुलतो
धरणीचे लावण्य पाहूनी
सृष्टी हि सवागतात रमते
जणू हिरव्या गालिच्यांमधुनी.


इतुके निरागस प्रेम पाहुनी
नयनही गेले आज दिपुनी
असे अनोखे मिलन पाहुनी
त्रृप्त जाहले आज मी मनी.


असे अनोखे मिलन पाहूनी
त्रृप्त जाहले आज मी मनी.

-माधवी..




मझ्या एका मैत्रिणीने हि कविता केली आहे. माधवीनं.
कविता मनाला भावली , वाटल आपल्याला पण असं कविता वैगरे करता आली असती तरं......
मस्त पैकी blog वर post केली असती....म्ह्टंल एकदा विचारतो तिला.... कि, करु का post तुझी कविता माझ्या blog वरं...आणि मग मी तिची रीतसर permission घेतली. ती हो म्ह्टंली, नुसतं हो नाहि, तर म्हंटली सगळ्या कविता post करं. खुप बंर वाटलं.

बुधवार, १३ फेब्रुवारी, २००८

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्यानं चालल्या पानावर्हल्यारे लाटा


मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन


मन जह्यरी जह्यरी याचं न्यारं रे तंतर
आरे, इचू, साप बरा त्याले उतारे मंतर!


मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात


मन चप्पय चप्पय त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज आलं आलं धर्तीवर


मन एवढं एवढं जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना


देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात!
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत!


देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं!



– बहिणाबाई चौधरी