मनातल्या आठवणी काही ब्लॉग वर लिहिता आल्या नाहीत कारण खूप आहेत सांगायला, पण मनातले विचार असे शब्दात मांडायचे म्हणजे जरा हिम्मत लागते. त्यातून काही लोकांचे ब्लॉग वाचले ना की वाटत आपण कधीच लिहु शकणार नाही अस आणि मग लिहिलेल लेख ड्राफ्ट म्हणून पडून रहातात, काही तर लगेचच डीलिट करतो. आत्ता हाच पोस्ट लिहीत सुटलोय खरा पण पोस्ट करेन की नाही माहीत नाही. तर आठवणी मनातल्या मध्ये मी स्वता: ला आठवण्याच प्रयातना करणार होतो, आठवणी मनातल्या ह्या लेबेल खाली लिहिलेल्या पहिल्या पोस्ट नंतर आज एक वर्षानंतर मी त्या सदरा बद्दल बोलतोय म्हणजे माझ्या आळशिपणाचा प्रत्येय तुम्हा सर्वाना आला असेलच. असो, नवीन वर्षात ब्लॉग साठी थोडा का होईना पण वेळ द्यायचा अस ठरवलय. एक संकल्पच म्हणा ना, हा संकल्प पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.