शनिवार, १ मार्च, २००८

नवे सदर: आठवणी मनातल्या-१

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥

संत तुकारामांनी केलेल्या ह्या रचनेत खुप कमी शब्दात कीती सहजरित्या लहानपणाचा गोडवा गायला आहे. फक्त वयाच लहानपण नाहि तर वर्तणुकीतल लहानपण. लहानपणी आपण कसे होतो? अगदी देवाला हवे असतो तसे, निरागस. नुकत्याच जन्मला आलेल्या त्या बाळाला काहिही कळत नसत, तरीहि कधी कधी हसतो अगदी खदखदुन हसतो. कोणाबरोबर हसतोय? अस विचारल, तर गावची म्हातारी माणस म्हणतात कि, बाप्पा बरोबर हसतोय, शंकर-पार्वती म्हणे गुदगुल्या करतात बाळ रडु नये म्हणुन.
आज मी माझ बाळपण आठवण्याचा प्रयत्न करतोय, पण ते पहिल निरागस हास्य अणि रड्न नाहि आठवणार मला, कोणालाच नाहि आठवणार. कारण तो काळ बाळपणीच्या आधीचा काळ असतो देवपणीचा काळ. आपल्याला काही कळायच्या आणि लक्षात रहायच्या आधिच देवबाप्पा आपल्याला भुल देतो मग आपण सगळ देवपण विसरतो आणि कळायला लागल्यापसुनचा काळ म्हणजे बाळपण, असा माझा खुळा समज आहे. मला तर बाळपण देखिल नाहि आठवत ठिकस. पण खुळ्या मनाची खुळी धडपड हि धडपड फक्त बाळपण आठवाण्याची आहे असं नाहि, तर आज पर्यंतचा स्वतःचा प्रवास शब्दात माडंण्याचा प्रयत्न. अशाच काही पुसट आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न करणार आहे या सदरात. सदराच बारस केलं. नाव ठेवल ’आठवणी मनातल्या’.

1 टिप्पणी:

Binary Bandya म्हणाले...

बाळपणीच्या आधीचा काळ असतो देवपणीचा काळ

हे वाक्य आवडले.
"देवपणीचा काळ" उपमा आवडली