मनातल्या आठवणी काही ब्लॉग वर लिहिता आल्या नाहीत कारण खूप आहेत सांगायला, पण मनातले विचार असे शब्दात मांडायचे म्हणजे जरा हिम्मत लागते. त्यातून काही लोकांचे ब्लॉग वाचले ना की वाटत आपण कधीच लिहु शकणार नाही अस आणि मग लिहिलेल लेख ड्राफ्ट म्हणून पडून रहातात, काही तर लगेचच डीलिट करतो. आत्ता हाच पोस्ट लिहीत सुटलोय खरा पण पोस्ट करेन की नाही माहीत नाही. तर आठवणी मनातल्या मध्ये मी स्वता: ला आठवण्याच प्रयातना करणार होतो, आठवणी मनातल्या ह्या लेबेल खाली लिहिलेल्या पहिल्या पोस्ट नंतर आज एक वर्षानंतर मी त्या सदरा बद्दल बोलतोय म्हणजे माझ्या आळशिपणाचा प्रत्येय तुम्हा सर्वाना आला असेलच. असो, नवीन वर्षात ब्लॉग साठी थोडा का होईना पण वेळ द्यायचा अस ठरवलय. एक संकल्पच म्हणा ना, हा संकल्प पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
गुरुवार, ३१ डिसेंबर, २००९
नूतन वर्षाच्या शुभेच्छा..!!!
जानेवारी २००८ मध्ये हा ब्लॉग बनवला मित्राच्या प्रेरणेमुळे ब्लॉग बनवला पण त्यावर लिखाण काही करता आल नाही. लिहीण्यासाठी वेळ, विचार, एक दिशा, कवी किंवा लेख असले पाहिजे अस काही नाही लागते ती फक्ता ईच्छा, आणि खरच स्वता:च अस काही लिहिण्याची ईछाच नाही झाली.
शुक्रवार, ३१ जुलै, २००९
दमलेल्या बापाची कहाणी
कोमेजून निजलेली एक परी राणी
उतरले तोंड,डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना॥ ना ना ना ना ना....
आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा तरी लोकलची वारी
रोज सकाळीच राजा निघताना बोले
गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परि येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी
खर्याखुर्या परीसाठी गोष्टीतली परी
मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना॥ ना ना ना ना ना...
(संदीपचा आवाज) गद्य:
ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी
(सलीलचा आवाज) पद्य:
उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हसूनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना ना ना ना ना....
(संदीपचा आवाज) गद्य:
दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी
(सलीलचा आवाज) पद्य:
कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला
आईपरी वेणी फणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची या कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
(संदीपचा आवाज) गद्य:
बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्त,जवळ पहायचंच राहिलं
(सलीलचा आवाज) पद्य:
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
ना ना ना ना ना ना ना ना ना ना...
--- संदीप खरे।
उतरले तोंड,डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना॥ ना ना ना ना ना....
आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा तरी लोकलची वारी
रोज सकाळीच राजा निघताना बोले
गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परि येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी
खर्याखुर्या परीसाठी गोष्टीतली परी
मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना॥ ना ना ना ना ना...
(संदीपचा आवाज) गद्य:
ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी
(सलीलचा आवाज) पद्य:
उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हसूनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना ना ना ना ना....
(संदीपचा आवाज) गद्य:
दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी
(सलीलचा आवाज) पद्य:
कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला
आईपरी वेणी फणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची या कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
(संदीपचा आवाज) गद्य:
बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्त,जवळ पहायचंच राहिलं
(सलीलचा आवाज) पद्य:
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
ना ना ना ना ना ना ना ना ना ना...
--- संदीप खरे।
गुरुवार, ३० जुलै, २००९
वपु
अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचा तरी हात शोधत असतो. आणि आपलाही हात असाच कुणालातरी हवा असतो. - वपु
रविवार, २६ जुलै, २००९
मी जिवंत आहे...पण ब्लॉग मृत घोषित झालाय
शेवटचा ब्लॉग लिहून आता वर्ष उलटून गेल, वेळ नाही अस नको म्हणायला खरतर वेळ देता येत नाही अस म्हणन योग्य वाटेल.कामाचा व्याप इतका वाढला आहे की, ब्लॉग लिहीन तर सोडाच पण मनातले विचार मांडायला सुद्धा वेळेवर वही पेन मिळत नाही.
आज झोपच लागत नाहीए आणि कशी कुणास ठाऊक पण मला माझ्या ब्लॉग ची आठवण झाली, काळ वेळ ना बघता सरळ लिहावयास बसलो. आत्ता कसले डोंबलाचे विचार येणार आहेत मनात पण ब्लॉग लिहायचाच आज असा निर्धार केलाय ना.
म्हणून आजचा हा निर्धार स्पेशल post...
कधी तरी पुन्हा भेटिन... पण काही नवीन विचारांसोबत....
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)