शनिवार, १ मार्च, २००८

बीज अंकुरे अंकुरे . .

'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत,
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात!

बिजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ,
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात!


मी लहन असताना एक मालिका लागयची "गोट्या" मस्त मलिका होती. वरील ओळी ह्या त्या शिर्षक गीताच्या आहेत. मला खुप आवडायच ते गाण. कोणाकडे असेल तर कृपया संपर्क करा.

नवे सदर: आठवणी मनातल्या-१

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥

संत तुकारामांनी केलेल्या ह्या रचनेत खुप कमी शब्दात कीती सहजरित्या लहानपणाचा गोडवा गायला आहे. फक्त वयाच लहानपण नाहि तर वर्तणुकीतल लहानपण. लहानपणी आपण कसे होतो? अगदी देवाला हवे असतो तसे, निरागस. नुकत्याच जन्मला आलेल्या त्या बाळाला काहिही कळत नसत, तरीहि कधी कधी हसतो अगदी खदखदुन हसतो. कोणाबरोबर हसतोय? अस विचारल, तर गावची म्हातारी माणस म्हणतात कि, बाप्पा बरोबर हसतोय, शंकर-पार्वती म्हणे गुदगुल्या करतात बाळ रडु नये म्हणुन.
आज मी माझ बाळपण आठवण्याचा प्रयत्न करतोय, पण ते पहिल निरागस हास्य अणि रड्न नाहि आठवणार मला, कोणालाच नाहि आठवणार. कारण तो काळ बाळपणीच्या आधीचा काळ असतो देवपणीचा काळ. आपल्याला काही कळायच्या आणि लक्षात रहायच्या आधिच देवबाप्पा आपल्याला भुल देतो मग आपण सगळ देवपण विसरतो आणि कळायला लागल्यापसुनचा काळ म्हणजे बाळपण, असा माझा खुळा समज आहे. मला तर बाळपण देखिल नाहि आठवत ठिकस. पण खुळ्या मनाची खुळी धडपड हि धडपड फक्त बाळपण आठवाण्याची आहे असं नाहि, तर आज पर्यंतचा स्वतःचा प्रवास शब्दात माडंण्याचा प्रयत्न. अशाच काही पुसट आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न करणार आहे या सदरात. सदराच बारस केलं. नाव ठेवल ’आठवणी मनातल्या’.





शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २००८

मिलन

आकाशातून धरतीला
भेटण्या सख्या तो आला
सरं सरं कोसळती धारा
किती भेटीसं आतूर झाला.


नवी भेट हि दोन क्षितीजांची
श्रावण मासि अलगद जाहली
ऊन पावसी खेळ पाहुनी
धरती हि ती जणू लाज़ली.



पहा पहा वरुण ही भुलतो
धरणीचे लावण्य पाहूनी
सृष्टी हि सवागतात रमते
जणू हिरव्या गालिच्यांमधुनी.


इतुके निरागस प्रेम पाहुनी
नयनही गेले आज दिपुनी
असे अनोखे मिलन पाहुनी
त्रृप्त जाहले आज मी मनी.


असे अनोखे मिलन पाहूनी
त्रृप्त जाहले आज मी मनी.

-माधवी..




मझ्या एका मैत्रिणीने हि कविता केली आहे. माधवीनं.
कविता मनाला भावली , वाटल आपल्याला पण असं कविता वैगरे करता आली असती तरं......
मस्त पैकी blog वर post केली असती....म्ह्टंल एकदा विचारतो तिला.... कि, करु का post तुझी कविता माझ्या blog वरं...आणि मग मी तिची रीतसर permission घेतली. ती हो म्ह्टंली, नुसतं हो नाहि, तर म्हंटली सगळ्या कविता post करं. खुप बंर वाटलं.

बुधवार, १३ फेब्रुवारी, २००८

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्यानं चालल्या पानावर्हल्यारे लाटा


मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन


मन जह्यरी जह्यरी याचं न्यारं रे तंतर
आरे, इचू, साप बरा त्याले उतारे मंतर!


मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात


मन चप्पय चप्पय त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज आलं आलं धर्तीवर


मन एवढं एवढं जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना


देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात!
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत!


देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं!



– बहिणाबाई चौधरी

बुधवार, ६ फेब्रुवारी, २००८

वपु


पहिल्या वहिल्या भेटीत माणसं किती जवळची व्हावीत याला काही हिशोब असतो का? गणित असतं का?
मैत्री म्हटलं की खरं तर हीशोब, गणितं वगैरे व्यवहारीक शब्द टीकतच नाहीत. तरीही हेच शब्द पटकन पुढाकार का घेतात?

कुठलेही हिशोब न ठेवता जी गणीताप्रमाणे नेमकेपणा देते ती मैत्री.

-वपु काळे

गुरुवार, २४ जानेवारी, २००८

एक अबोल "मोरपिस"........


विचरांच हे असं असतं काल पर्यंत त्या स्लॆमबुक ची आठवण पण नव्हती, काल मात्र बंड्याबरोबर गप्पा करताना विषय निघाला आणि बोलत सुटलो.

college चा शेवटचा वर्ष स्लॆमबुक भरण्याचि लगिन घाई चालू होति, स्लॆमबुक भरणे म्हणजे फ़ार काही कठीन वॆगरे असतं अशातला भाग नाही, जर तो एका मित्राचा असेल तर; पण एखाद्या मुलीचा असेल आणि ती मुलगी अगदी खास असेल तर..... तितकच अवघड होवून जात.

अशाच एका मुलीचा स्लॆमबुक माझ्याकडे आला , म्हणजे तिने दिला; एकदम अनपेक्षित पणे ती माझ्याकडे आली. मला अपेक्षाच नव्हती कारण, त्या तीन वर्षात ती खुप भाडंली मझ्यासोबत अगदी अबोलपने भाडांयची, अगदी अबोलपणे बोलयाची तिच्या अबोल नजरेन.

ती अबोल असायची कारण,
तिलाही माहित होत कि, मी तिच्यावर प्रेम करतोय
.

स्लॆमबुक माझ्या हातात देउन म्हणाली "लवकर परत दे" .
"बस्स... इतकच". अस्स म्हणाल ना तुम्ही.
माझ्यासाठी हेच खुप काही होत.
आता प्रश्न होता तो "काय लिहायच?"
मी
तिचा स्लॆमबुक चाळुन पहिला, जवळ जवळ last लिहीणारा मी असेन मोजुन मापुन - पान उरली होती . आता काय लिहायच हा विचार करत असताना माझं लक्ष B. L. Thareja च्यां पुस्तकाकडे गेलं, अणि अवघड प्रश्नाचं साध ऊत्तर सापडल. तीन वर्षांपासुन जपुन ठेवलेल्या पिंपळपानात ते ऊत्तर दडलं होत. First Year ला असताना तिच्या वहीतून पडलेल. ते पान तिच्या स्लॆमबुक मध्ये चिटकवून त्यावर लिहीलं,
"....मी"
दुसरया दिवशी तिला स्लॆमबुक परत दिला.
तिने मला विचारल "इतक्या लवकर झाल लिहून"
मी म्हंटल"हो".
तीने स्लॆमबुक उघडलं आणि आज ती हसली त्या "....मी" बरोबर अगदी मनसोक्त हसली पण तिचं हसण सुध्दा अबोल होत तिच्या अबोल भांडणासारख.
तिने विचारल "तुझा स्लॆमबुक नाहि का देणार मला लिहायला?".
मी हसुन म्हंटल "तु माझा स्लॆमबुक लिहिण्याची गरज नाहि वाटत मला"
तीन विचारल "का?"
तिच्या ’का?’ ला खरंच किती सरळ आणि साधं ऊत्तर होत; पण मी हि अबोलपणे टाळलं आणि म्हंटल, "देतो उद्या".

आज मला ती सॆमबुक परत करणार होती. lecture सपंला आणि तिने मला बाहेर बोलावल, स्लॆमबुक माझ्या हातात देउन निघुन गेली. एका पानावर मोरपिस चिटकवुन
तिन ही लिहीलं होतं,
"....मी"
ते मोरपिस आणि पिंपळपान खुप वर्षांपासुन एकत्र होते. तिच्या वहीत.
वहीतून पडलेल्या त्या पिंपळपानाची आणि मोरपिसाचि भेट होता होता राहिली..
पण मोरपिसांतली ती मात्र कायमची माझी झाली. आजही ती तशीच आहे अबोल.
एक अबोल "मोरपिस"........



॥श्री गणेशाय नम: ॥

नमस्कार !
आज मी श्री गणेशाय करतोय..........
कसला ??
कसला काय विचारता? आज मी ब्लॊग नाहि का बनवला, "मनातल्या मनात".
पण, एक problem आहे. मी कोणि विचारवंत नाही, लेखक नाही, आणि कवी तर नाहीच नाही....
आहे कि नाही मोठठा problem ?
..."नाही"
कोण आहे रे तिकडे? कोण म्ह्टंल नाही??
.
.
.
ओळखलस मला? नाही ना? ....ओळखणारही नाहिस, अरे तुझ्यातला ’तु’ विसरणारा तु, तुला ’मी’ कसा आठवणार. अरे मी प्रशांत तुझ्यातला प्रशांत"

असा गवसला मला मझ्यातला ’मी’, आणि झाला "श्री गणेशाय" माझ्या ब्लॊगचा.