मंगळवार, १५ मे, २०१२

"नशिबाचा खेळ"...'?'

देव म्हणे परीक्षा घेतो आपली...मी म्हंटल देवाला, 
" घे बाबा परीक्षा, पण विषय कुठला? अभ्यासक्रम काय? तारीख-वार -वेळ?"
काहीतरी कळून द्याव न आधी...पण ते नाही पटत ना बाप्पाला...
सगळच अचानक कळल्यावर बावरतो ना राव आम्ही...
आमचे होतात हाल, आणि तुम्हीं म्हणता "नशिबाचा खेळ"...'?'

शनिवार, १२ मे, २०१२

देव शोधून थकलो आम्ही

देव शोधून थकलो आम्ही, देव नाही, आणि देवपणहि नाही,
संत म्हणून गेले, 'देव माणसात शोधावा' 
म्हंटल माणूस शोधून पाहावा
पण अंती कळले माणूस हि उरला नाही,
आणि जो उरला; त्याला माणुसकीच कळली नाही... -(प्रशांत ठाकूर)

शुक्रवार, ११ मे, २०१२

किनारा सोडून फार खोलवर आलोय


किनारा सोडून फार खोलवर आलोय, खरच थकलोय फार हि नाव वल्हवून...
शांत बसलोय आता, प्रवाह नेहील  तिकडे जाण्याची मानसिक तयारी ठेऊन...
सगळच माझ्या हातात असताना, मोकळाही झालोय वर बोट दाखवून... - ( प्रशांत ठाकूर)

मंगळवार, १ मे, २०१२

महाराष्ट्र दिन

१ मे १९६०, 'बॉम्बे' हे राज्य भाषांवार तत्वावर  विभागले गेले आणि त्यातून दोन राज्यांची निर्मिती झाली, महाराष्ट्र आणि गुजरात. 'बॉम्बे स्टेट', कोंकण प्रांत, विदर्भ आणि मराठवाडा हे प्रांत मिळून एक महाराष्ट्र निर्माण केला, सहजासहजी नाही तर असंख्य बलिदानातून ह्या महाराष्ट्राची निर्मिती झाली तो हा आजचा दिवस महाराष्ट्र दिन साजरा केला जातो...खर तर हा उत्सव बलिदानाचा...

बुधवार, २६ जानेवारी, २०११

तू फक्त माझं झाड..

तू फक्त माझं झाड माझ्यावरल उन काढ

मी तुझा तारा नाही मला बघून दिशा ठरव

मी तुझा वारा नाही भिरभिर माझ्यामध्ये हरव

उधाणलेला समुद्र असेन पण तुझा किनारा नसेन

लाटांवरती स्वार हो माझ्यावरून पार हो

तुझ्यामध्ये भिजून उभा तसाच उभा राहीन मग

तू मात्र चालत रहा तू मात्र पुढेच बघ

अशीच असते गोष्ट खरी असच असत खर जग

मला तुझा शेवट नाही अस कस म्हणू सांग

आठवण आठवण आठवण आठवणींची लांबच रांग

अशा कितीक गोष्टी आणि अशा कित्येक रांगा

असे कित्येक किनारे आणि अशा कित्येक बागा

मीच माझा तारा तरी मलाच माझी दिशा नाही

मीच माझा वारा आणि भिरभिरणारा पाचोळा हि

उधाणलेला समुद्र मी पण खरच किनारा म्हणजे काय

अजून आहेत माझ्या वरती कितीक ठसे कित्येक पाय

मी थकून थकून जातो पायाखालचा रस्ता होतो

वाटेत एखाद झाड भेटत सावली मधून अंगाला खेटत

पण पुढे प्रवास तसाच असतो एकच पक्षी उडता दिसतो

चोचीमध्ये गाण असत पंखावर उन नसत

फ़क़्त काळजावरल्या खुणा सांगत राहतात पुन्हा पुन्हा

ते फ़क़्त तुझं झाड तुझ्या वरल उन काढ

तू फ़क़्त माझा झाड माझ्यावारलं उन काढ


- सौमित्र (तरीही)

मंगळवार, १८ जानेवारी, २०११

माझ आभाळ तुला घे तुझ आभाळ मला

माझ आभाळ तुला घे तुझ आभाळ मला
आठवाच्या परुम्बिला बांधू एक झुला
माझा झुला तुला घे तुझा झुला मला
वाऱ्यावर पसरला मखमलीचा शेला
माझा शेला तुला घे तुझा शेला मला
माझ आभाळ तुला घे तुझ आभाळ तुला
माझ आभाळ तुला घे तुझ आभाळ तुला

बुधवार, १२ जानेवारी, २०११

एवढंच ना...एकट जगू...

काही माणस काही नाती इतकी गुंता गुंतीची असतात
काही वेळा माणस आपल्या आयुष्यात येतात, आपली होऊन जातात.
सवयीची झालेली हि माणस अचानक आयुष्यातून निघू जाऊ पहातात.

खूप विचार केल्यावर वाटल, जे माझे आहेत ते माझ्यापाशी आहेत.जे माझ्या पाशी नाहीत ते कधीच माझे नव्हते त्रास होतोय अस म्हणताना सुद्धा पण हेच खर आहे आणि हे स्वीकारून पुढे जाण सुद्धा तितकाच क्लेशदायक आहे.

हेच आयुष्य आहे का?

संदीप खरे आणि त्याच्या कवितांचा चा आधार वाटतो अशा वेळी,

एक ओळ म्हणूनच कि काय सहजच ओठी रेंगाळली.... एवढंच ना...एकट जगू...