एक सुरक्षित शहर म्हणून पुण्याची प्रतिमा सार्या भारतभर होती, शिक्षणाच माहेरघर, महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी अशी एतिहासिक बिरुद मिरवणारा आणि मागच्या ५-१० वर्षापासून IT हब म्हणून जगभर ख्याति मिळवलेला पुणे शहर.
लष्करी प्रशिक्षण केंद्र आणि म्हणूनच चारही बाजूने असलेले लष्करी भाग म्हणजे पुण्याची जणू तटबंदी वाटत होती एक आर्त विश्वास होता की पुण्यात दहशतवाद आणि हे असेल बॉम्बस्पॉट वैगरे तर अशक्यच वाटत होत. पण विश्वासाला सुरक्षेची जोड हवी होती ती सुरक्षा देण्यास आमच सरकार आपुर पडल का? की my name is khan आणि IPL सारख्या मुद्द्यांपुढे दहशतवादाचा मुद्दा सोयीस्कर पणे विसरून गेलेले विरोधक अपयशी ठरले क? की राहुल गांधीच्या सुरक्षा व्यवस्थेत कौतुकास्पद कर्तव्या दक्षता दाखवलेले आमचे पोलीस अपयशी ठरले? की नागरिक म्हणून आपणच गफिल राहिलो? खूप प्रश्न आहेत.
एवढ मात्र नक्की की आपल पुणे आता सुरक्षित राहील नाही...
बोंम्बस्पोट अणि दहशत वाद ह्यावर इतक लिहिले की अजुन चार शब्द लिहिण्यात कही अर्थ उरलेला नाही. अता खरा तर गरज आहे ती action plan ची पण देव जाणो केंव्हा ती वेळ येइल अणि केंव्हा आमचा भारत देश ह्या सर्व बंधनातुन मुक्त होइल अणि महासत्तेकडे खर-या अर्थाने वाटचाल करेल देव जाणो.
काळजी करू नका, काळजी घ्या... स्वता:ची अणि इतरांची सुद्धा..
बॉम्बस्पोटात मरण पावलेल्याना श्रद्धांजली....
- एक पुणेकर
1 टिप्पणी:
काळजी घ्या... स्वता:ची अणि इतरांची सुद्धा..
aapan evadhech karu shakato...
टिप्पणी पोस्ट करा