शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०

ग्रुप कॅप्टन सचिन तेंडूलकर

मागच्या चार पाच दिवसापासून TV वर एकच बातमी एकत होतो, ती म्हणजे क्रिकेट - स्पॉट फिक्सिंग-पाकिस्तान आणि वाटत होत कि खेळाचा इतका वाईट घोडाबाजार होतोय कि कोणताही खेळ आणि कोणता तरी खेळाडू ह्यातून वाचू शकला असेल का?

एक भारतीय म्हणून मी एक नाव निश्चित घेऊ शकतो ते नाव म्हणजे सचिन तेंडूलकर. आमचा सचिन ह्या सगळ्या कलुषित वातावरणापासून कितीक अंतर दूर आहे. क्रिकेटच आपला देव आणि मैदान हेच आपल मंदिर असा विचार करणारा आमचा सचिन ह्या सगळ्या गोष्टींच्या आसपास देखील भटकणार नाही. हे असले विचार त्याच्या मनाला शिवत देखील नसतील. तो मुळात पैशासाठी खेळतच नाही तो खेळतो त्याच्या भक्तीसाठी एक एक धाव जणू तो आपल्या मैदान मंदिरात त्याच्या क्रिकेट देवाला अर्पण करत असतो. आणि प्रत्येक शतकाला घालत असतो अभिषेक धावांचा नवनवीन विक्रमांचा.

आज जेंव्हा बातमी एकली कि सचिन ला 'ग्रुप कॅप्टन' हि पदवी बहाल करण्यात आलीये तेंव्हा पुन्हा एकदा सचिन ला सलाम केला. त्याच्या प्रत्येक चौकार-षटकारा साठी टाळ्या वाजवायला उंचावणारे माझे हात आज उंचावले ते त्याला salute करायला. भारतीय वायुदलाने सचिनच्या उत्तुंग कामगिरीबद्दल आणि त्यान भारतासाठी क्रिकेट मधून दिलेलं योगदान ह्याच गौरव करण्यासाठी दिला गेला आहे. सचिन हा पहिलाच खेळाडू आहे ज्याला हे सन्माननीय पद प्राप्त झाल आहे. त्याची कारकीर्द हि कोणत्याही जवनापेक्षा किंचितही कमी नसावी. जेंव्हा जेंव्हा सचिन मैदानावर खेळत असतो तेंव्हा ती रणभूमी वाटू लागते आणि त्याच खेळ म्हणजे युद्ध. त्या युद्धातही असते कमालीची शिस्त, एकाग्रपणा, प्रामाणिकपणा आणि आक्रमक खेळी करूनही चेहऱ्यावर असतो आत्मविश्वास आणि शत्रूचाही विश्वास डळमळीत करणार त्याच स्मित हास्य. त्याच ते हास्याच देत असत आम्हालाही खात्री कि शेवटचा सैनिक आणि शेवटची गोळी असेपर्यंत लढू शकणारा हा आमचा योद्धा जोपर्यंत त्याची आग ओकणारी तोफ घेऊन त्याच्या जागी उभा आहे तोपर्यंत मैदानही आमचच आणि विजयही. त्याच्या ह्याच सर्व गुणांमुळे त्याला हि पदवी शोभून दिसते. त्याला मिळालेली हि पदवी आम्हा तरुणांना क्रिकेट प्रमाणेच वायुदलाकडेही आकर्षित करेल हीच अपेक्षा.

३ टिप्पण्या:

BinaryBandya™ म्हणाले...

captain असाच असतो ..श्रीलंका /NZ मालिकेमध्ये आपले तेंडूलकर साहेब नव्हते तर काय वाईट हालत झाली बघ ..
धोनी ब्रिगेड ला असाच captain हवा आहे ..
तो कप्तान म्हणून नाही खेळणार पण तो टीम मध्ये असला म्हणजे काही औरच मजा असते ...
त्याच्याबद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे ..

प्रशांत म्हणाले...

खर आहे...लिहू तितक कमीच...

अनामित म्हणाले...

For him the only sentence can be written..."Murti Lahaan,Kirti Mahaan".
God must be feeling proud after looking to his such a nice HUMAN-Creation.